jump to navigation

जीवनसत्वे (व्हिटामीन्स) आणि खनिज पदार्थ(मिनरल्स). February 10, 2007

Posted by indianalternativemedicine in Uncategorized.
trackback


जीवनसत्वे:

अ(A)
प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते
पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी–यातून मिळते

ब१(B1)
पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक
हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस–यातून मिळते

ब२(B2)
मनावरील ताण कमी करते, पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी मदत करते, पेशींना प्राणवायू पुरवते
यीस्ट, अंड्यातील पिवळा बलक, हिरव्या पालेभाज्या, दूध–यातून मिळते

ब३(B3)
कोलेस्टरॉल कमी करते, रक्ताभिसरणातील दोष दूर करते, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते
हिरव्या पालेभाज्या, दाणे, यीस्ट–यातून मिळते

ब५(B5)
शरीरातील शक्ती वाढवते
धान्ये, सोयाबीन, अंड्यातील पिवळा बलक–यातून मिळते

ब६(B6)
प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त, मनावरील ताण कमी करते, हार्मोन्स तयार करते
सोयबीन, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, सूर्यफुलाच्या बीया–यातून मिळते

ब१२(B12)
पेशी निर्मिती साठी आवश्यक, लाल रक्तपेशी तयार करण्यात महत्वाचा सहभाग
यीस्ट, दुग्धजन्य पदार्थ–यातून मिळते

फॉलिक ऍसिड
लोह पचण्यास मदत करते, शरीरातील रक्ताची पातळी कायम राखते (गर्भवती स्त्रीला याची दुप्पट गरज असते)
गडद हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, कंदभाज्या, दूध, खजूर, संत्र्याचा रस–यातून मिळते

क(C)
प्रतिकारशक्ती वाढवते, अल्सर निर्मितीस विरोध करते, दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते, लोह पचविण्यास मदत करते
लिंबूवर्गातील फळे (संत्रे, मोसंबी…) कांदा, लसुण, मिरची, हिरव्या पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, कलिंगड, बटाटे, द्राक्षे–यातून मिळते

ड(D)
कॅल्शियम पचविण्यास मदत करते, हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक)
सुर्यप्रकाश, लोणी, दूध, अंड्यातील पिवळा बलक–यातून मिळते

इ(E)
रक्तात गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते, रक्तप्रवाह सुरळीत ठेवते, पेशींना प्राणवायू पुरविण्यात मदत करते
लोणी, अंडी, लेट्युस, पुर्ण धान्ये, दूध, पालक, सोयबीन, सुर्यफूल, भोपळा–यातून मिळते

फ(F)
कोलेस्टेरॉल कमी करते, हृदयरोगांचा प्रतिकार करते
दाणे, काजू–यातून मिळते

के(K)
रक्ताभिसरणासाठी उपयुक्त. (गर्भवतीला शेवटच्या महिन्यात अतिशय उपयुक्त)
यीस्ट, गडद हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, सुर्यफूलाचे तेल, अंड्यातील पिवळा बलक–यातून मिळते

खनिजे

लोह
सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते, पेशींमधील महत्वाच्या कार्यांना चालना देते (गर्भवतीस अतिशय आवश्यक)
चेरीचा रस, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, पुर्ण धान्य, सुकामेवा, कलिंगड, अंड्यातील पिवळा बलक, बीट

कॅल्शियम
हाडांच्या व दातांच्या जडणघडणीसाठी आवश्यक, मज्जातंतू तसेच स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवते
दूध, गडद हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, संत्री, पपई, कलिंगड, गाजर–यातून मिळते

फॉस्फरस
कॅल्शियम, तसेच ड जीवनसत्वाच्या कार्यात मदत करते, उत्तम हाडांसाठी आवश्यक, शरीरातील ग्रंथींच्या कार्यासाठी आवश्यक
दुग्धजन्य पदार्थ, पूर्णं धांन्ये, धान्याचे मोड, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, काजू, बदाम–यातून मिळते

पोटॅशियम
स्नायुंचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक, शरिरात सोडीयम ची आवश्यक पातळी कायम ठेवते
केळी, खजूर, पपई, धान्याचे मोड, पालेभाज्या–यातून मिळते

मॅग्नेशियम
प्रथिनांच्या पचनास, तसेच चरबीच्या वापरात मदत करते, कॅल्शियमची आवश्यक पातळी कायम ठेवते, तणावापासून मुक्ती देते
हिरव्या पालेभाज्या, काजू, बदाम, दुग्धजन्य पदार्थ–यातून मिळते

झिंक
उत्तम वाढीसाठी, मेंदू आणि चेतासंस्था निर्मितीस सहाय्यक, आजार लवकर बरे करते. (स्त्रीयांना दूध पाजताना अत्यंत आवश्यक)
केळी, पुर्ण धान्ये, काजू, बदाम, धान्याचे मोड, दुग्धजन्य पदार्थ–यातून मिळते

Advertisements

Comments»

1. अनु - March 14, 2007

ही अनुदिनी वाचली.माहिती उपयुक्त आहे.मागे एकदा ‘भाज्यांतली कोणकोणती जीवनसत्वे काय प्रक्रियेने नष्ट होतात/होत नाहीत’ ही माहिती आपण इथे देऊ शकाल का?

2. अनु - March 14, 2007

ही अनुदिनी वाचली.माहिती उपयुक्त आहे.मागे एकदा ‘भाज्यांतली कोणकोणती जीवनसत्वे काय प्रक्रियेने नष्ट होतात/होत नाहीत’ ही माहिती आपण इथे देऊ शकाल का?


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: