काही नेहेमीच्या वन्स्पती-फळे व घरगुती औषधोपचार February 20, 2007
Posted by indianalternativemedicine in घरगुती औषधोपचार.trackback
प्राथमिक स्वरूपाचे उपचार फ़क्त सर्वसाधारण तक्रारींकरता. काहि क्लिष्ट व्याधींसाठी वॆद्यकीय मार्गदर्शन आवश्यक आहे
- अडुळसा:-
पाने वाटून रस करणे.कफ़ावर उत्तम औषध–अडुळसा रस १ चमचा,मध १/२ चमचा,थोडी पिंपळी–३ ते ४ वेळा चाटणे. उष्णता,नाकातून रक्त येणे- अडुळसा रस १ चमचा,खडीसाखर जखम-अडुळसा पाने वाटून जखमेवर बांधणे.
- अननस:-
फ़ोडी,रस दिवसातून १ ते २ वेळा मिरी पावडर टाकून अननस रुचीप्रद आहे,अजीर्ण कमी करतो. पोटात केस गिळला गेल्यास अननस त्रास कमी करतो. फार वेळा लघवी होणे त्या करिता उपयोगी.
- आले:
आल्याचा रस १ चमचा,गरम तूप १/२ चमचा,खडीसाखर १/२ चमचा. मीठ,आले खाल्यास रूची उत्पन्न होते.घसा साफ होतो.जिभेचा बुळबुळीत पणा नाहीसा होतो. श्वासाची तक्रार कमी होते.
- आवळा:
फार मोठे औषध आहे.पित्त झाल्यास आवळा+खडीसाखर घ्यावे.आम्लपीत्तावर -आवळा रस १ चमचा,थोडी जिरेपूड,खडीसाखर सकाळ-संध्याकाळ असे ८-१० दिवस घेतल्यास बरे वाटते.च्यवनप्राश आणि मोरावळा ह्या मधला आवळा हा मुख्य घटक आहे.
- क्रमश:
–डॉ. वि. दी मुजूमदार
Comments»
No comments yet — be the first.