jump to navigation

मधुमेह, हृदयविकार दूर ठेवणे February 20, 2007

Posted by prasannam in आजार.
trackback

मधुमेह, हृदयविकार या आजारांना जर आपणास दूर ठेवायचे असेल, तर आपल्याला आपली जीवनपद्धतीत बदल करण्यावाचून पर्यायच नाही.

त्यासाठी खालील चार गोष्टीचा अवलंब करणे चांग्ले होईल.

  • नियमित व्यायाम – शारीरिक हालचाल नियमित व्यायाम ही आपल्या शरीराची दैनंदिन गरज आ हे. (झोपणे, खाणे, पिणे इ.पेक्षाही जास्त महत्त्वाची) व्यायाम हा नियमित असावा. कमीत कमी अर्धा ते एक तास शारीरिक हालचाल, चालणे, प्राणायाम, योगासने यांचा योग्य समावेश असावा. व्यायामामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहते, चरबी कमी होते, इन्शुलिनचे कार्य सुधारते, त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यापासून आपण निश्‍चितच दूर राहू शकतो.
  • नियमित पथ्य – पाश्‍चात्त्य जीवनपद्धतीचे अंधानुकरण करताना आजच्या पिढीने आपले खाणे- पिणे पूर्णपणे चुकीचे केले आहे. व्यायामाबरोबर समतोल आहार ही अत्यंत निकडीची बाब आहे. आपल्या आहारातील फास्टफूड, तळलेले, वातूळ पदार्थ, अधिक उष्मांक असलेले पदार्थ, मद्यपान, धूम्रपान यांचे प्रमाण कमी करून समतोल सात्त्विक आहार पद्धती आपण अवलंबिणे गरजेचे आहे. वेळी- अवेळी खाणे, चुकीचे अन्न खाणे आणि गरजेपेक्षा जास्त खाणे, या तिन्ही गोष्टी आपण टाळल्या तर बऱ्याचशा गोष्टी आपोआप साध्य होतील. जास्त उष्मांक असलेल्या पदार्थांपेक्षा फळे, पालेभाज्या, कडधान्ये, सॅलड या घटकांचा जास्तीत जास्त वापर करणे तसेच एक दोन वेळा जास्त खाण्यापेक्षा तीन- चार वेळा थोडे थोडे खाणे, तसेच रात्रीचा आहार लवकर आणि कमी प्रमाणात घेणे हितावह आहे.
  • ताणतणाव कमी करणे – आजच्या धकाधकीच्या यंत्रयुगात आपणास टीव्ही, कॉम्प्युटर, सोफा, गाड्या ही आरामाची सवय जरी लागली असली तरी याबरोबरच आधुनिकीकरणाबरोबर आपोआपच आलेली प्रचंड दैनंदिन धावपळ आपल्या शरीर तसेच मनावरील ताण वाढवीत आहेत. या ताणाचे परिणाम शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांवर होत आहेत.
  • नियमित तपासण्या – चोरपावलांनी येणारे मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, रक्तदाब हे विकार किंवा त्यांचे दुष्परिणाम यांचा योग्य वेळी प्रतिबंध करणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्‍यता इतर
Advertisements

Comments»

No comments yet — be the first.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: