jump to navigation

डाळिंब(दाडिम) March 13, 2007

Posted by indianalternativemedicine in औषधे, घरगुती औषधोपचार, वनस्पती, सूचना.
trackback

डाळिंबाला संस्कृतमध्ये “दाडिम’ म्हणतात.डाळिंबामुळे पचनशक्ती वाढते, तोंडाला चव येते.दाडिमावलेह ,दाडिमचतुःसम, दाडिमाष्टक, दाडिमादि चूर्ण, दाडिमाद्य तेल आदी औषधीत डाळिंब हे घटक आहे.हे हृदयरोगावर उपयुक्त आहे.

उलट्या होत असल्यास डाळिंबाचा रस चाटवावा किंवा अन्न शिजवताना त्यात डाळिंब घालावे.

वारंवार येणाऱ्या तापामुळे फिकेपणा आला असेल, तर ताज्या डाळिंबाचा रस किंवा दाडिमावलेह द्यावा.

अनेक दिवसांचा कोरडा खोकला व दम लागत असेल, तर डाळिंबाचा रस व मधाचे चाटण दिवसभर वारंवार द्यावे.. डाळिंबाच्या सालीचे चूर्ण मधात मिसळून चाटल्यास घशातला कफदोष कमी होतो.

तोंडाला चव नसताना आंबट-गोड डाळिंबाचे दाणे थोड्याशा सैंधव मिठासह खाण्याचा उपयोग होतो. तापामुळे किंवा
पोटात कळ येऊन शौचाला होणे, जुलाब होणे, अपचनाची तक्रार, वरचेवर पोट दुखणे अशा तक्रारींसाठी डाळिंबाचा रस किंवा डाळिंब घालून शिजवलेली पेज, सूप उपयोगी आहेत.

पित्त वाढल्यामुळे तहान-तहान होत असल्यास डाळिंबाचे दाणे चावून खाण्याचा किंवा घोट-घोट रस घेण्याचा उपयोग होतो.

औषधामध्ये डाळिंबाचे फळ, फुले व फळाची साल वापरली जाते.डाळिंबाच्या फळाची साल जुलाब थांबवते. पाव चमचा डाळिंबाच्या सालीचे चूर्ण, एक अष्टमांश चमचा जायफळाचे गंध व अर्धा चमचा मध एकत्र करून तयार केलेले मिश्रण थोडे थोडे चाटले असता जुलाब थांबतात.

कधी घट्ट व कधी पातळ मलप्रवृत्ती होत असता दाडिमाष्टक उपयुक्‍त असते.

खूप आंबट मात्र काही प्रमाणात पित्तकारक असते

याचे लॅटिन नाव प्युनिका ग्रॅनाटम Punica granatum असे आहे.

(दोन लेखांतून काही प्रमाणात महत्वाचे मुद्दे संकलीत)
एक चांगला लेख पहा:http://www.esakal.com/esakal/12152006/17EDD2BD0F.htm

Advertisements

Comments»

No comments yet — be the first.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: