jump to navigation

सकाळ — उपचार खांद्याच्या सांध्यावर (डॉ. संजय देसाई, अस्थिरोगतज्ज्ञ, मुंबई) March 9, 2009

Posted by prasannam in फॅमिली डॉक्टर.
trackback

खांद्याची सांधेदुखी अत्यंत त्रासदायक आणि दैनंदिन जीवनातील अनेक कृती दुष्कर करणारी ठरू शकते. अशी सांधेदुखी दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया प्रचलीत आहेत. मात्र, सांध्याच्या नैसर्गिक उतींचा विकास होऊ देणारे नवे तंत्र अधिक प्रभावी ठरते…
आपल्या शरीरातील सर्व सांध्यांपैकी आपल्या खांद्यांची हालचाल साधारणतः सर्वात जास्त होत असते. खांद्यामधील हालचाल मंदावली, तर एखाद्याच्या दैनंदिन आयुष्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. जेव्हा खांद्याची हालचाल सीमित होते तेव्हा समोर असलेल्या वस्तूंपर्यंत पोहोचणे, केस विंचरणे, दात घासणे, डोक्‍यावरून शर्ट ओढणे किंवा पाठ खाजविणे यांसारख्या सोप्या सोप्या गोष्टीसुद्धा करणे कठीण किंवा अशक्‍यही होऊ शकते, तसेच यामुळे होत असलेल्या वेदना आणि सूज यांकडेही दुर्लक्ष करता येऊ शकत नाही.

प्रचंड वेदना आणि खांद्याच्या सांध्यांची हानी यांचे सर्वात सामान्य कारण म्हणजे संधिदाह असते. गुडघा आणि नितंबाच्या संधिदाहापेक्षा खांद्याचा संधिदाह कमी प्रमाणात आढळून येतो; पण जेव्हा हा होतो त्या वेळेस तो अतिशय मुश्‍कील अडथळा बनतो. सर्वसाधारणपणे खांद्याचा संधिदाह ५० वर्षांहून अधिक वयाच्या रुग्णांना सतावतो. ज्यांना आधी खांद्याला इजा झालेली आहे, सर्वसाधारणपणे अशा लोकांना याचा त्रास होतो. तसेच हे गुणसूत्रांवरही अवलंबून आहे. याचाच अर्थ या त्रासाचा कौटुंबिक इतिहास असेल तर पुढील पिढीतही हा त्रास उद्‌भवू शकतो. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (यूएसए) नुसार सुमारे ७ कोटी वयस्क लोकांना संधिदाह आणि- किंवा सांधेदुखीने त्रस्त आहेत.

ऑस्टिओआर्थरायटिस, ऱ्हुमटाईड आर्थरायटिस आणि धक्‍क्‍यामुळे निर्माण होणारा संधिदाह ही सांध्यांच्या हानीची सर्वसाधारण कारणे असतात.

– ऑस्टिओआर्थरायटिस किंवा शरीरातील हाडांची झीज झाल्यामुळे निर्माण होणारा संधिदाह ही एक चांगल्या गुणांचा ऱ्हास करणारी परिस्थिती आहे. यामुळे हाडाच्या बाहेरील बाजूच्या गुळगुळीत आवरण नाहीसे होते. हाडांची सुरक्षा करणारे हे आवरण खांद्याच्या संधिदाहामुळे नाहीसे होते तेव्हा मूळ हाड सांध्यामध्ये उघडे पडते. हा त्रास सर्वसाधारणपणे ५० वर्षे वयाच्या पुढील लोकांना होतो.

– ऱ्हुमटाईड आर्थरायटिस ही सांध्यांमध्ये पद्धतशीरपणे दाह निर्माण करणारी परिस्थिती आहे. यामुळे सांध्यांच्या कडेला दाह निर्माण होतो. यामुळे काळानुसार हाडावरील सुरक्षा आवरण नाहीसे होते आणि हाडे ठिसूळ बनू लागतात. हा त्रास कुठल्याही वयाच्या व्यक्तींमध्ये उद्‌भवू शकतो आणि तो सर्वसाधारणपणे शरीराच्या दोन्ही भागातील एकाहून जास्त सांध्यांवर परिणाम करतो.

– एखाद्या धक्‍क्‍यामुळे निर्माण झालेला संधिदाह एक प्रकारचा ऑस्टिओआर्थरायटिस असतो जो खांद्याच्या सांध्यामधील फॅक्‍चर किंवा सांधा निखळणे अशा प्रकारच्या त्रासानंतर निर्माण होतो. खांद्याचा सांधा निखळण्यामुळे खांद्यामुळे अस्थिरता निर्माण होऊन त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होते. अनेक वर्षांत पुनः पुन्हा अशा प्रकारे सांधा निखळल्यामुळे त्याचे रूपांतर संधिदाहामध्ये होऊ शकते, तसेच खांद्याला झालेल्या काही फॅक्‍चरमुळेही संधिदाह निर्माण होऊ शकतो.

जर औषधे आणि व्यायाम यामुळेही संधिदाहाच्या प्रचंड वेदनांपासून सुटका होत नसेल, तर खांद्याचा सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया हाच सर्वात योग्य पर्याय ठरतो. परंपरागत शस्त्रक्रियेमध्ये त्याला टोटल शोल्डर रिप्लेसमेंट असेही म्हणतात. त्यात खांद्यात सांधा बनवणाऱ्या हाडांचा इजा झालेला भाग पूर्णपणे काढून धातू आणि प्लॅस्टिकचे भाग बसवतात. हाताच्या वरच्या बाजूस असलेले गोळ्यांच्या आकाराचे हाड आणि खांद्यामधील त्रिकोणी भाग यामुळे बदलला जातो.

परंतु वैद्यकीय तंत्रज्ञानातील आधुनिक सुधारणांसह आता हाडांचे संवर्धन करण्याची नवीन संकल्पना शोधून काढण्यात आलेली आहे. खांदा बदलण्याच्या या तंत्राला “जॉईंट रिसर्फेसिंग टेक्‍निक’ असेही म्हणतात. खांदा संपूर्णपणे बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी हा एक पर्याय आहे. ही एक अशी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये रुग्णांना त्यांच्या नैसर्गिक उती मोठ्या प्रमाणात सुस्थितीत ठेवता येतात, तसेच यामध्ये संपूर्ण सांधा न बदलता सांध्याचा केवळ खराब झालेला भाग बदलला जातो. यामध्ये ह्युमरल हाडावर विशेष धातूचे आवरण बसविले जाते. त्यामुळे रुग्णाच्या नैसर्गिक उती मोठ्या प्रमाणात बचावतात. त्यामुळेच हा तरुण रुग्णांसाठी अधिक चांगला पर्याय ठरतो. यासाठी कोबाल्ट कोम संयुगाचा वापर करतात. त्याला छोट्या धातूच्या पट्टीचा आधार असतो. पट्टीच्या आतल्या बाजूस खरखरीत आवरण असते. यात सिमेंटचा वापर केला जात नाही. यामध्ये सिमेंटऐवजी रुग्णाच्या नैसर्गिक विकसित उतींचा वापर बळकटीकरणासाठी केला जातो. यातील खरखरीत सच्छिद्र आवरण रुग्णाच्या नैसर्गिक उतींचा नैसर्गिकरीत्या विकसित होऊ देते. वैद्यकीय परिभाषेत याला “बायालॉजिकल टिश्‍यू इन ग्रोथ’ किंवा “बायोलॉजिकल फिक्‍सेशन’ म्हणतात.

या कृत्रिम सांध्याचा आकार घुमटासारखा असतो, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्थिरता आणि सुविधा मिळते. हे कृत्रिम सांधे अनेक आकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे शल्यविशारदांना आपल्या रुग्णांसाठी योग्य आकाराचे सांधे निवडायला मदत होते.

रिसर्फेसिंगमुळे सांध्यांच्या दुखण्यामध्ये लवकरात लवकर वेदनांपासून सुटका होते, तसेच भविष्यात गरज भासल्यास संपूर्ण सांधा बदलण्याची शल्यक्रिया करणेही शक्‍य असते.

Advertisements

Comments»

No comments yet — be the first.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: