jump to navigation

सकाळ — एषणापूर्तीसाठी बल! (डॉ. श्री बालाजी तांबे) March 9, 2009

Posted by prasannam in फॅमिली डॉक्टर.
trackback

प्राणैषणा, धनैषणा आदी “एषणा’ पूर्ण करायच्या असल्या, आपापली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडायची असतील तर त्यासाठी शक्‍तीची अर्थात बलाची नितांत आवश्‍यकता असते. आयुर्वेदाने बलाचे तीन प्रकार सांगितले आहेत. त्यांची माहिती…
पुनर्जन्म असतो व तो या जन्मात केलेल्या बऱ्या-वाईट कर्मानुसार चांगला किंवा वाईट, सुखयुक्‍त किंवा दुःखयुक्‍त असा मिळणार असतो हे एकदा पटले की साहजिकच चांगल्या कर्माची आवश्‍यकता ध्यानात येऊ शकते. ही परलोक एषणा होय.

परलोक एषणा पूर्ण करण्यासाठी चारही पुरुषार्थ – ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम यांचे यथायोग्य पालन करायला सांगितलेले आहे.

गुरुशुश्रुषायाम्‌ अध्ययने व्रतचर्यायाम्‌ – गुरुंची सेवा करणे, त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे अनुकरण करणे, विद्येचे अध्ययन करणे, व्रत, अनुशासन अंगी बाणवणे.

दारक्रियायां अपत्योत्पादने भृत्यभरणे अतिथिपूजायां दाने अनभिध्यायाम्‌ -योग्य वेळी गृहस्थाश्रमाचा स्वीकार स्वीकार करून संपन्न, निरोगी अपत्यास जन्म देणे, पदरीच्या व हाताखालच्या लोकांचे भरणपोषण करणे, अतिथीचे स्वागत करून त्याला शक्‍य ती मदत करणे, यथाशक्‍ती व योग्य ठिकाणी दान देणे तसेच दुसऱ्याचे धन घेण्यास, काम न करता आयता मिळणारा मोबदला स्वीकारण्यास नकार देणे.

तपसि अनसूयायां देहवाङ्‌मानसे कर्मणि अक्‍लिष्टे – तपस्या करणे, असूया त्यागणे, शारीरिक व मानसिक कर्म करत राहणे. यालाच, अपेक्षारहित समाजसेवा करणे, सत्कृत्य करणे, समाजाच्या भल्यासाठी व इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांसाठी विनामोबदला काम करणे, समाज संघटित राहण्यासाठी दुष्प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी प्रयत्न करणे या पुरुषार्थाची जोड द्यावी. थोडक्‍यात स्वतःच्या मर्यादित कुटुंबाच्या बाहेर पडून समाजरूपी मोठ्या कुटुंबासाठी काम करणे म्हणजे वानप्रस्थाश्रम स्वीकारणे होय.

देहेन्द्रियमनःअर्थबुद्‌ध्यात्मपरीक्षायां मनःसमाधौ इति – शरीर, इंद्रिय, मन, विषय, बुद्धी, आत्मा यांची परीक्षा करून या सर्वांचे वास्तव स्वरूप समजून घेऊन मनास समाधी अवस्थेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे मनाचे संतुलन टिकविणे; आसपासच्या इतर लहान-मोठ्या व्यक्‍तींचे कालमानानुसार, सांप्रतकाळच्या सामाजिक, आर्थिक व्यवस्थेनुसार वेगवेगळे समज असू शकतात, तेव्हा त्यात लुडबूड न करणे; परस्वाधीनता येणार नाही, नुसती शरीरिकच नाही तर मानसिक स्वाधीनता कायम राहण्यासाठी प्रयत्नरत राहणे; हे संन्यासाश्रमाचे प्रत्यक्ष स्वरूप होय.

या प्रकारे जीवनात वेळेवारी योग्य त्या गोष्टींचा अवलंब केला, त्या त्या अवस्थेत आवश्‍यक ती सर्व कर्तव्ये पार पाडली तर त्यामुळे इहलोकातही सुख, यश, कीर्तीचा लाभ होतो व नंतरही स्वर्गप्राप्ती होते.

कोणतेही काम करायचे असले तर त्यासाठी मुळात ताकद लागते. प्राणैषणा, धनैषणा वगैरे एषणा पूर्ण करायच्या असल्या, आपापली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडायची असतील तर त्यासाठी शक्‍तीची नितांत आवश्‍यकता असते. शक्‍ती म्हणजे बल. आयुर्वेदाने बलाचे तीन प्रकार सांगितले आहेत,

त्रिविधं बलमिति सहजं कालजं युक्‍तिकृतं च ।
… चरक सूत्रस्थान

सहज म्हणजे जन्मजात मिळालेले, कालज म्हणजे वयानुरूप तसेच ऋतुनुरूप मिळालेले व युक्‍तिकृत म्हणजे प्रयत्नपूर्वक मिळवलेले.

सहजं यत्‌ शरीरसत्त्वयोः प्राकृतम्‌ ।
… चरक सूत्रस्थान

सहज बल म्हणजे शरीर व मनाला स्वभावतःच मिळालेली ताकद. हे जन्मजात बल आई-वडिलांकडून मिळालेले असते आणि यात जन्मानंतर फारसा बदल करता येत नाही. आपण व्यवहारात

Advertisements

Comments»

No comments yet — be the first.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: