jump to navigation

सकाळ — प्रफुल्ल – प्रत्येक व्यक्ती, प्रति परमेश्‍वर ( डॉ. राजेंद्र बर्वे ) March 9, 2009

Posted by prasannam in फॅमिली डॉक्टर.
trackback

पुराणातल्या गोष्टी वाचणं मोठं रंजक असतं. देव-दैत्य, सुर- असुर, देव आणि राक्षस म्हणजेच सुष्ट आणि दृष्ट अशा प्रतिस्पर्धी शक्तींमधला संघर्ष सतत होत असतो आणि त्यात सुष्ट शक्तीचाच अखेरीस विजय होतो. दुष्टांचे निर्दालन होते आणि सृष्टी त्या भयंकर, अन्यायी, जुलमी दुष्टांपासून मुक्त होते. …….
देव, सुर म्हणजेच सुष्ट शक्ती असं का बरं करते? कारण त्या परमेश्‍वराचं या सृष्टीवर प्रेम असतं, परमेश्‍वराचं मन करुणेनं भरलेलं असतं. सृष्टीबद्दल अपरंपार आपुलकी वाटते, म्हणूनच परमेश्‍वर अशा लढाया करतो बरं! अशी समजूत होते किंवा असल्यास दृढ होते. प्रश्‍न असा पडतो की परमेश्‍वर असं का बरं करतो? उत्तर सोपंय हो! त्या परमेश्‍वरानंच तर सृष्टी निर्माण केली. तो परमेश्‍वर आपल्यावर बापासारखा प्रेम करतो. तो आपला निर्माता आहे. परमेश्‍वर सृष्टी निर्माण करतो. असा टाइपचा युक्तिवाद आपल्याला सहसा आढळतो. आपण थोडे चक्रावून जातो. परमेश्‍वराची ही व्याख्या आकर्षणपण अविश्‍वसनीय वाटते. मित्र हो, पण ती प्रतिकात्मक मानली तर विलक्षण सामर्थ्य आपल्या मनात निर्माण करू शकते! या व्याख्येप्रमाणे, प्रत्येक जण परमेश्‍वर ठरतो! मानसशास्त्र म्हणतं की प्रत्येक विचार करू शकणारी व्यक्ती आपल्या मनात आणि मनातर्फे एक सृष्टी निर्माण करते. आपली सृष्टी आपल्या नियमानुसार चालते. रॅशनल विचार करणारी माणसं आपापल्या मनात सृष्टी असते तशीच्या तशी निर्माण करतात. त्यांच्या मनात प्रतिसृष्टी निर्माण होते. काही अविवेकी माणसं, भोळी माणसं त्यांच्या मनात सृष्टी निर्माण करतात ती बरीचशी कपोलकल्पित असते. कल्पना राज्यातली असते. पण असते त्या व्यक्तीनं निर्माण केलेली जो प्रतिसृष्टी निर्माण करतो तो परमेश्‍वर अशी व्याख्या स्वीकारली तर प्रत्येक व्यक्तीच प्रतिपरमेश्‍वर झाली! प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्‍वराइतकं सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य असतं. प्रत्येक व्यक्ती प्रतिसृष्टी कल्पिणारी प्रतिपरमेश्‍वर ठरते. मस्त वाटतं ना?

– डॉ. राजेंद्र बर्वे

Advertisements

Comments»

No comments yet — be the first.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: